जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्यचे प्रदेश अध्यक्ष एल एस कदम व संपर्कप्रमुख मयुर पवार यांच्या मार्फत सुजित भानुशाली यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
निवडी नंतर सुजित भानुशाली म्हणाले की जनशक्ती युवा संघटना ही राज्यातील होणारे अन्याय,सामान्य जनतेची होणारी लूट, विद्यार्थ्यांची होणारी लूट,तसेच सर्वसामान्य लोकांचे दुर्लक्षित असलेले प्रश्न अशा अनेक अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.तसेच युवकांच्या विचारांना स्वतंत्र व्यासपीठ देऊन त्यांच्यातील नेतृत्व क्षमतेला उभारी देऊन सामान्य जनतेला न्याय देण्याचे प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून केले जाणार आहेत
त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक युवकांनी जनशक्ती युवा संघटने मधे सहभागी होऊन सामजिक कार्याला उभारी द्यावी असे आवाहन केले.
0 Comments