Ticker

6/recent/ticker-posts

को.जी.मा.शी पतपेढी च्या वतीने व्ही.जी पोवार यांचा सत्कार

 को.जी.मा.शी पतपेढी च्या वतीने व्ही.जी पोवार यांचा सत्कार


      शिक्षण क्षेत्रातील समस्येची जाणीव असणारा व सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्ही.जी.पोवार यांच्या राज्य महामंडळावर उपाध्यक्षपदी निवडीने उचित सन्मान झाला असल्याचे प्रतिपादन को.जी.मा.शी च्या चेअरमन सौ सुनीता पाटील यांनी केले.
       को.जी मा.शी पतपेढी च्या वतीने महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवडीबाबत सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.
       व्ही.जी.पोवार यांच्या निवडीने सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला असून या निवडीमुळे डी.बी.पाटील यांचा सन्मान झाल्याचे स्पष्ट केले व को.जी.मा.शी पतपेढीच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल प्रसंशा उदगार काढले.
       याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक तानाजी पाटील,महादेव चौगुले,सुप्रिया शिंदे,मनीषा खोत,एस.बी.पाटील, आर.एस.पाटील, आर.बी.पाटील,शिवाजी लोंढे अरुण कांबळे,अभय व्हनवडे, वरेकर,शाहीर सदाशिव निकम,केशव चौगुले उपस्थित होते.
         कार्यक्रमाचे स्वागत संचालक मनोहर पाटील यांनी केले प्रास्ताविक एल.डी.पाटील यांनी केले तर आभार संस्थेचे व्हा.चेअरमन सदाशिव चौगुले यांनी मानले.

व्ही.जी.पोवार यांचा सत्कार करताना को.जी.मा.शि.च्या चेअरमन सुनिता पाटील व्हा.चेअरमन सदाशिव चौगुले व सर्व संचालक मंडळ.■

Post a Comment

0 Comments