Ticker

6/recent/ticker-posts

प्रतिनिधी,प्रमोद चिनके सांगली जिल्हा,सांगली. *महिंद्रा कंपनीच्या CSR फंडातून मिरज सिव्हिल रुग्णालयात 20 फाऊलर बेड्स उपलब्ध करून दिले.

प्रतिनिधी,
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा,
सांगली.
    *महिंद्रा कंपनीच्या CSR फंडातून मिरज सिव्हिल रुग्णालयात 20 फाऊलर बेड्स उपलब्ध करून दिले.....!*
      वर्तमान परिस्थितीतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच जग, शासकीय यंत्रणा , सेवा व्यवस्था व इतर सर्वच प्रशासकीय व्यवस्था हतबल होताना दिसून येत असतानाच अनेक सेवाभावी संस्था रुग्णांच्या सेवेसाठी, त्यांना संसाधने, औषधे यांचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेत असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. प्रशासनही अशा संस्थांना प्रोत्साहनपूर्ण सहकार्य करत आहे. 
      रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बेड्सची विशेषतः O2 बेड्सची व व्हेंटिलेटर्सची संख्या अतिशय तोकडी पडत आहे. अशा परिस्थितीत दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांनी मदत करावी असे प्रशासनाने आवाहन केलेले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून डॉ. सुहास वाघ फाउंडेशनचे श्री. धनंजय वाघ, मंगेश येडूरकर, सतीश साखळकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा व अथक प्रयत्न करून टेक महिंद्रा कंपनीच्या CSR फंडातून मिरज सिव्हिल रुग्णालयात 20 फाऊलर बेड्स उपलब्ध करून दिल्यामुळे रुग्णांच्या सुविधेत मोलाची भर पडणार आहे. 
     त्यासाठी डॉ. सुहास वाघ फाउंडेशनचे श्री. धनंजय वाघ यांचे मिरज सिव्हिल प्रशासनाने आभार मानले आहेत. श्री. धनंजय वाघ, मंगेश येडूरकर, सतीश साखळकर, उमेश गुड्डी, विवेक रुपनर व फाउंडेशनचे इतर मान्यवर सहकारी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे व इतरांनीही यातून आदर्श घ्यावा अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments