Ticker

6/recent/ticker-posts

यावर्षी शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळणार तरी किती ?

यावर्षी शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळणार तरी किती ?      

अतुल पाटील
उपसंपादक, राधानगरी लाईव्ह

       आजच्या घडीला पाहायचे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या स्थितीवर ऊसाचा दर अवलंबून आहे बाजारपेठेत साखरेचे दर जैसे थे असल्याकारणाने यावेळी उसाला दर मिळणार तरी किती असा प्रश्‍न शेतकऱ्यांच्यात निर्माण झाला आहे. आजच्या घडीला पाहायला गेले तर पेट्रोल-डिझेल गोडेतेल, खत तसेच इतर गोष्टी यांच्या महागाईचा भस्मासुर निर्माण झाला आहे आज बाजारपेठेत पाहायचे झाले तर पेट्रोल डिझेल दर गगनाला भिडले आहेत त्याच्या पाठोपाठ कधीकाळी चाळीस रुपये प्रमाणे मिळणारे गोडेतेल आज पहायला  गेले तर १८० ते २०० रुपये पोहोचले आहे शेतीची मशागत तपासून पाहायचं गेले तर ऊस कारखान्याला जाईल तोपर्यंत चा हिशोब जर केला तर शेतकऱ्यांच्या पदरात पडतात किती? पण याचा विचार कारखानदार यांनी करण्याची गरज आहे.

    एकीकडे कोरोना तर दुसरीकडे महागाईचा भस्मासुर या सगळ्याचा विचार करून कारखानदार यावर्षी शेतकऱ्याच्या ऊसाला ५ ते ७ हजार रुपये प्रति टन देण्यात सक्षम आहेत का तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या संघटना कारखानदारांकडून प्रती टन ५ ते ७ हजार रुपये दर घेणार का ?शेतकऱ्यांच्या उसाला दर द्यायचा म्हटलं तर कारखानदारांचे उत्तर ठरलेलं असतं बाजारपेठेत साखरेला साखर दर नाही, पण पेट्रोल डिझेल गोडेतेल तसेच अन्य वस्तू याला भाव मिळतो पण माझ्या शेतकऱ्याच्या साखरेला भाव मिळत नाही. 

   मग पाहू यावेळी शेतकऱ्यांच्या संघटना शेतकऱ्यांच्या साठी शेतकऱ्याच्या पाठीमागे किती ठामपणे  उभा राहून शेतकऱ्याच्या ऊसाला ५ ते ७ हजार रुपये दर मिळवुन देतात ?काही एफ आर पी नुसार ३०० ते ७०० रुपयांची वाढ देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसतात म्हणून म्हणतो उसाला दर मिळणार किती.

Post a Comment

0 Comments