शशिकांत पाटील यांच्याकडून गारगोटी कोविड सेंटरला ५ ऑक्सिजन सिलेंडर प्रदान
समीर मकानदार
भुदरगड
कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात कोरोना महामारीने आहाकार माजवला आहे. ऑक्सिजन च्या अभावामुळे लोकांचा श्र्वास गुदमरून अनेक निष्पाप जीवांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. जवळची माणसे बघता बघता नाहीशी होत आहेत.
ज्यांनी मदत करायला हवी होती त्या लोकप्रतिनिधींनी निवडणूक झाल्यावर जणतेकडे पाठ फिरवली. मग जणतेने मदत मागायची कोणाकडे? अशी सर्वत्र परिस्थिती निर्माण झाली असताना, एका शेतकरी कुटुंबातील शशिकांत पाटील हा युवक लोकांच्या मदतीसाठी पुढे आला व गारगोटी कोवीड सेंटर साठी तब्बल ५ ऑक्सिजन सिलेंडर ची मदत केली.
तिरवडे गावातील शशिकांत पाटील हा शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला सामाजिक कार्यकर्ता, वडीलांचा शेती व्यवसाय, आर्थिक परिस्थिती सामान्य. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडीलांना कोरोना च्या त्रासामुळे गारगोटी कोवीड सेंटर मधे उपचारासाठी दाखल केले होते. आज त्यांची प्रकृती उत्तम झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो या उद्देशाने त्यांनी ५ ऑक्सिजन सिलेंडर रिफेलची मदत गारगोटी कोवीड सेंटर ला केली. यावेळी त्यांच्यासोबत गारगोटी चे सरपंच संदेशराव भोपळे, डाॅ.धनंजय देसाई, प्रहार संघटनेचे मच्छिंद्र मुगडे, धनंजय महाडिक युवाशक्ती तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, बजरंग कुरळे, इंद्रजित गाडेकर, सचिन गुंड आदींसह मान्यवर उपस्थित होते.
0 Comments