Ticker

6/recent/ticker-posts

नारायण शिरोळकर प्रतिनिधी चंदगड इब्राहिमपुर ग्रामपंचायत तसेंच आरोग्य विभागा कडून ग्रामस्थाची आरोग्य तपासणीस नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद .

 इब्राहिमपूर ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी नागरीकांचा उत्फुर्त प्रतिसाद 



नारायण शिरोळकर ( चंदगड प्रतिनीधी ) 



कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पहाता कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार चंदगड तालुक्यातील सर्व नागरीकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात असून इब्राहिमपूर ग्रामपंचायत, ग्रामकृतीदल आणि चंदगड तालुका आरोग्य विभागाच्या वतीने इब्राहिमपूर ग्रामस्थांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली ज्यामध्ये पहिल्या टप्यात १०० कुटुंबांतील सर्व लोकांचे तापमान आणि गरजेनुसार आॅक्सीजन लेवलच्या नोंदी यावेळी घेण्यात आल्या. एकुण तीन टप्यात सदर तपासणी पार पडणार असून उर्वरीत कुटुंबाच्या चाचण्या या १९ मे व २० मे रोजी पूर्ण करण्यात येतील अशी माहिती इब्राहिमपूरचे युवा सरपंच निळकंठ देसाई यांनी दिली.

इब्राहिमपूर ग्रामपंचायत, कोरोना ग्रामकृतीदल, चंदगड आरोग्य विभाग, अंगणवाडी सेवीका, प्राथमिक शिक्षक यांच्या माध्यमातून इब्राहिमपूर ग्रामस्थांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात असुन पहिल्या टप्यात पार पडलेल्या तपासणीस इब्राहिमपूर ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती इब्राहिमपूरचे उपसरपंच तुकाराम हरेर यांनी दिली असून यापुढील दोन्ही टप्यांतील तपासणीस देखील इब्राहिमपूर ग्रामस्थ असाच प्रतिसाद देवून सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

यावेळी सरपंच निळकंठ देसाई, उपसरपंच तुकाराम हरेर, यांच्यासह  हणमंत सुतार, उत्तम पाटील, भा.स.पाटील, संजय कुंभार, नारायण घुरे, यशवंत ओवुळकर ,अंगणवाडी सेविका रेश्मा भातकांडे,सरूबाई ओउळकर, मनिषा गुरव, विद्या पवार, लता घुरे, आशासेविका शिल्पा मांग ग्रामपंचायत कर्मचारी अनंत कदम आणि सागर कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments