Ticker

6/recent/ticker-posts

कागलमध्ये अनावश्यक फिरणाऱ्याची जाग्यावर कोरोना तपासणी


कागलमध्ये अनावश्यक फिरणाऱ्याची जाग्यावर कोरोना तपासणी

विजय कांबळे
कागल/प्रतिनिधी

      कागल शहरात रिकामटेकडे उनाडक्या करीत फिरणा-यांची जाग्यावर टेस्ट घेतली.बसस्थानक चौकात सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत च्या चार तासात वीस  लोकांचे स्वॅब घेतले .त्यामध्ये चार लोकांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने त्यांची रवानगी कागल कोवीड सेंटरला करण्यात आली.ही यापुढे कायम चालू ठेवणार असल्याचे कागल नगरपालीकेचे आरोग्य अधिकारी नितीन कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
     कागल नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने आठ दिवस लॉक डाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची जाग्यावर रॅपिड अँटीजेन्ट टेस्ट करून कोरीना बाधित आहेत की नाहीत हे पाहिले जात आहे. ही तपासणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. घरातच रहा.. सुरक्षित राहा.. विनाकारण फिरू नका... असे आवाहन पालिकेचे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी केले आहे.
         कोरोना महामारी ने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. मोठमोठ्या शहरापासून ते ग्रामीण भागात कोरोना बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर फार मोठा ताण पडत आहे. असे असून देखील नागरिक या भयानक कोरोनाकडे दुर्लक्ष करून विनाकारण फिरताहेत. जाग्यावर कोरोना तपासणीमुळे अनावश्यक फिरणाऱ्यावर मर्यादा येईल असे वाटते. आठ दिवसाच्या लॉक डाऊनच्या काळात कागल शहरातील खर्डेकर चौक, गैबी चौक तसेच बसस्थानक चौक या ठिकाणी व्यापारासाठी फिरणाऱ्यांचीही कोरोनाची मोफत तपासणी केली जात आहे, ग्रामीण रुग्णालयातील लॅब टेक्निशियन विजय कोळी हे पिपियी किट घालून तपासणी करत आहेत. टेक्निशियन राजश्री पाटील त्यांना सहकार्य करीत आहेत.असे पालिका आरोग्य अधिकारी नितीन कांबळे यांनी सांगितले.
         मुख्याधिकारी पंडित पाटील, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, डॉक्टर सुनिता पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली या तपासण्या होत आहेत. यावेळी सपोनि दीपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक प्रीतमकुमार पुजारी, नगरसेवक प्रवीण काळबर, विवेक लोटे तसेच अभिजीत गोरे, प्रताप डोने, सुरेश शिंदे, आर आर पाटील, आनंदा कोंडरे, यांच्यासह पोलीस व पालिका कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------------

Post a Comment

0 Comments