Ticker

6/recent/ticker-posts

तलाठी, यांची कर्तव्य आणि कार्यक्षेत्र

 !!! तलाठी !!!


 तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. 
●जमिनीसंबंधीची रेकॉर्डे सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यांत आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो.
भारतातील ब्रिटिश राजवटीत १८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी(हिंदीत पटवारी) या पदाची नव्याने निर्मिती केली गेली.

● ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन सरकार व जनता यांमधील दुव्याचे काम करणे.
शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.
नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी व तहसीलदारांस देणे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५४ नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेले संपादन याचे नोंदवहीत विवरण घेणे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रकांची सूची तयार करावी व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.

तलाठ्याची कर्तव्ये

▪ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन सरकार व जनता यांमधील दुव्याचे काम करणे.
▪शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.
▪नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी व तहसीलदारांस देणे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५४ नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेले संपादन याचे नोंदवहीत विवरण घेणे.
▪जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रकांची सूची तयार करावी व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
  
तलाठी
- मंडळ अधिकारी - तहसिलदार - प्रांत अधिकारी - जिल्हाधिकारी- अशी पदांची चढती रचना आहे.*

  कार्यक्षेत्र
सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक गाव कामगार तलाठी असतो. अशा गावाच्या समूहास हिंदीत सजा अथवा साझा असे म्हटले जाते. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील सर्वसाधारणपणे १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरुप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो.

Post a Comment

0 Comments