भोगावतीचे मा व्हा चेअरमन मा एम आर पाटील देवाळेकर दादा यांचे निधन
संदीप कलिकते
(कौलव प्रतिनिधी )
भोगावती परिसराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देवाळे गावचे माजी सरपंच मारुतराव रामजी पाटील तथा एम आर पाटील देवाळेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले
भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पाटील कौलवकर आणि कृषीमंत्री श्रीपतराव बोंन्द्रे यांचे ते निष्ठावंत सहकारी होते. स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर मेमोरियल ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष होते भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद व दोनदा
संचालक पद त्यांनी भूषविले होते. भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे ते विद्यमान संचालक होते. देवाळे गावातील विविध सहकारी संस्थांच्या स्थापनेत ते संस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.ते मरेपर्यंत राजकारणात कौलवकर घरण्याशी एकनिष्ट राहीले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते प्रा निवास पाटील यांचे ते वडील होत.
0 Comments