Ticker

6/recent/ticker-posts

भुदरगड तालुक्यातील लोटेवाडीत २३ कोरोनापॉझिटिव्ह:गावकरी भयभीत:आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष :

भुदरगड तालुक्यातील लोटेवाडीत २३ कोरोना
पॉझिटिव्ह:गावकरी भयभीत:आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष :

बाळासाहेब बोडके
भुदरगड प्रतिनिधी


 कोल्हापूर जिह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे.त्याबरोबर  भुदरगड तालुक्यातही कोरोनाने कहर केला आहे  यातच भुदरगड तालुक्यातील लोटेवाडी गावात कोरोनाने थैमान घातले असून  गावामध्ये एकूण २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली आले आहे.

  गावातील  गावकरी सध्या भीतीच्या सावटाखाली असून येथील आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून लोटेवाडी 

 ग्रामपंचायत विभागाने  संपूर्ण गाव लॉकडाऊन  करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 सध्या लोटेवाडी गावात जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे . गावातील  सर्वच किराणा दुकाने,गिरणी बंद करण्यात आली आहेत .ग्राम समितीने गावात विनाकारण फिरणाऱ्या लोकांना दंड करण्या बरोबर कुणीही  विनाकारण न भिरण्याच्या सूचना कोरोना ग्राम  दक्षता कमिटीने दिल्या आहेत.


खबरदारी म्हणून गावात आरोग्य विभागाने लक्ष देऊन येथील परिस्थिती हाताळण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोग्य प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास येथे कोरो ना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments