Ticker

6/recent/ticker-posts

हुपरी शहरात तत्काळ कोविड सेंटर सुरू करावे ; मुरलीधर जाधव.

हुपरी शहरात तत्काळ कोविड सेंटर सुरू करावे ; मुरलीधर जाधव.

 - शिवसेना जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांची मंत्री मा.ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे मागणी

निशांत यादव
हुपरी
      
      हुपरी शहर हे हातकणंगले तालुक्यातील एक मोठे शहर आहे. शहराची लोकसंख्या अंदाजे ५० ते ६० हजार व परिसरातील लोकसंख्या मिळून अंदाजे १ लाखाच्या वर आहे. शहराच्या चांदी उद्योगाची आशिया खंडामध्ये चांगली ओळख आहे. त्याचबरोबर शहरालगत कागल- हातकणंगले औद्योगिक वसाहत अस्तित्वात आहे. तसेच परिसरातील सर्वच गावे (पट्टणकोडोली,तळंदगे,इंगळी,रेंदाळ, यळगूड,रांगोळी,जंगमवाडी) हुपरी शहरावर आरोग्य सेवेकरिता अवलंबून आहेत. तसेच कर्नाटक सीमा जवळ असलेने सीमाभागांतील नागरिकांचाही हुपरी शहराशी सततचा संपर्क येत असतो.

      सद्यपरिस्थितीत महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर हुपरी व परिसरातील गावेही त्याला अपवाद नाहीत. गेल्या काही दिवसांत हुपरी शहर व परिसरातील गावांमध्ये कोरोना रूग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. परंतु हुपरी व परिसरातील भागांत कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाचे कोणतेही कोविड सेंटर अथवा टेस्टिंग सेंटर उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांची आरोग्यसेवेविना मोठी हेळसांड होत आहे. त्यामुळे हुपरी शहरात शासनातर्फे तत्काळ कोविड सेंटर व टेस्टिंग सेंटर (आर.टी.पी.सी.आर व अँटीजेन) उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांनी शिष्टमंडळासह आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना भेटून केली.

    यावेळी मंत्री मा.ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हुपरी शहरामध्ये तत्काळ कोविड सेंटर व कोविड टेस्टिंग सेंटर सुरू करण्याबाबत प्रांताधिकारी इचलकरंजी व तालुका आरोग्य अधिकारी हातकणंगले यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच हुपरी शहरात लवकरच शासनाचे कोविड सेंटर सुरू होईल, अशी माहिती शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांनी दिली.

      यावेळी शिष्टमंडळात शहरप्रमुख अमोल देशपांडे,नगरसेवक बाळासो मुधाळे,माजी विभागप्रमुख राजेंद्र पाटील,युवासेना शहर अधिकारी भरत देसाई व रेंदाळ ग्रा.पं.सदस्य महेश कोरवी सहभागी झाले होते.!

Post a Comment

0 Comments