Ticker

6/recent/ticker-posts

*शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.....!* प्रतिनिधी, प्रमोद चिनके सांगली जिल्हा प्रतिनिधी, सांगली जिल्हा, सांगली. मोबा:-९४०५५५५५५७

 आज दिनांक 28/5/ 2021 शुक्रवार शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनातून अशी मागणी करण्यात आली की     


    


1) मुंबई महापालिकेच्या धर्तीवर सांगली महापालिकेने देखील 15 लाख कोरोणा लसीचे डोस खरेदी टेंडर काढावे.

 2) केंद्र सरकारने आपले आडमुठे धोरण बदलून विविध देशाच्या विविध लस खरेदी करण्यास व आयात करण्यास परवानगी सर्व राज्यांना परवानगी द्यावी.

3) राज्य सरकारने ग्लोबल टेंडर मधील लस खरेदी तात्काळ 8 दिवसात पूर्ण करावी

4) उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मागेल त्या कंपनीला मागेल त्या ठिकाणी कोरोना लसीचे उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ परवानगी द्यावी काही अटी शर्ती घालून

    वरील मागणीप्रमाणे शिवसेनेच्या वतीने सांगली-मिरज महापालिका उपायुक्त संतोष रोकडे साहेब यांना समक्ष निवेदन देऊन सांगली महापालिकेने मुंबई महापालिकेच्या धर्तीवर 15 लाख कोरोणा लसीचे डोस तात्काळ खरेदी करण्याचे टेंडर काढावे म्हणजे जेणे करून सांगली व आजूबाजूच्या परिसरातील लोक कोरोना साथीच्या आजारापासून सुरक्षित होतील सांगली-मिरज व आजूबाजूची खेडे पाडे जसे की माधवनगर, बुधगाव, कवलापूर, नांद्रे, हरिपूर, अंकली, मालगाव, म्हेशाळ,तुंग, कळंबी, वगैरे सुद्धा सांगली महापालिकेची सांगलीची आपलीच गावे असल्याने महापालिकेने या सर्व गावांना सुद्धा लसीकरण करावे त्यासाठी 15 लाख कोरोना लसीचे डोस खरेदी तात्काळ करावी अशी मागणी सदरचे निवेदनातून करण्यात आली.

    15 लसीचे डोस खरेदी करणे महापालिकेला 30 ते 35 कोटी रुपये खर्च करणे सहज शक्य आहे.

      केंद्र सरकार संपूर्ण भारतभर फक्त 3 प्रकारच्या लसीच्या आयातीला परवानगी दिली आहे कोव्हॅक्सिंन, कोवि शील्ड, व स्फुटनिक व्ही, या तीनच लसीना आयातीस परवानगी दिली आहे केंद्र सरकारने आपले आडमुठे धोरण बदलून भारतीय लोकांच्या जीवाशी न खेळता विविध देशातील विविध कंपनीच्या जसे की फायजर,जॉन्सन अंड जॉन्सन, व मोर्डरना, व इतर कंपनीच्या आयातीस तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी सदरचे निवेदनातून करण्यात आली.

       मागेल त्या कंपनीला मागेल त्या ठिकाणी लस उत्पादन करण्यास तात्काळ परवानगी द्यावी परवानगी देत असताना काही अटी व शर्तीची पूर्तता करून अगदी अति थोडक्या कालावधीत मागेल त्या कंपनीला मागेल त्या ठिकाणी तात्काळ कोरोना लस उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून तात्काळ उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी मागेल त्या ठिकाणी मागेल तिथे केंद्र सरकारने उत्पादन करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सदरचे निवेदनातून करण्यात आली.

   खास बाब म्हणून केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला विविध देशातील विविध कोरोना लस आयात करण्यास परवानगी द्यावी कारण महाराष्ट्रात संपूर्ण भारताच्या मानाने खूप मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण असल्याने महाराष्ट्र राज्याला 12 ते 15 कोटी लसीची तात्काळ गरज असल्याने केंद्र सरकारने याबाबतचे सर्व राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने महाराष्ट्राच्या जनतेच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यास व आयात करण्यास खास बाब म्हणून राज्य सरकारला परवानगी द्यावी अशी मागणीही यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

    यावेळी उपस्थित जितेंद्र शहा,रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळपकर, लक्ष्मण वडर इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments