Ticker

6/recent/ticker-posts

मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप. नंदगाव प्रतिनिधी : सचिन चौगले ‌ ‌ ‌

 !*शाहूवाडी तील दिव्यांगांना मिळाला मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेचा आधार.                  जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप.*


नंदगाव प्रतिनिधी : सचिन चौगले



         ‌                                    ‌          शाहूवाडी तालुक्यातील अपंगांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या आस्था अपंग संस्था शाहूवाडी कोल्हापूर यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना महामारीमध्ये जीवन जगणे असह्य झालेल्या निराधार अपंग बांधव-भगिनींना मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद, नवी दिल्ली यांचे राष्ट्रीय अध्यक्ष किशनजी गोयल ,राष्ट्रीय उपाध्यक्ष महमदयासीन शेख यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी तर्फे पंकज इंगळे (चीफ मनेजर, बँक ऑफ बडोदा कोल्हापूर) सौ कांचनताई पाटील यांच्या विशेष सहकार्याने निराधार अपंग बांधव व भगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.‌                 ‌                                                       कार्यक्रमाप्रसंगी अपंग         संस्थेचे अध्यक्ष प्रा.बाजीराव वारंग म्हणाले, एकीकडे कोरोनाची भीती व दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे होणारी उपासमार अशा दुहेरी चक्रात अडकलेल्या अपंग बांधव भगिनींना मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट नवी दिल्ली यांचेमार्फत मिळालेली जीवनावश्यक वस्तूंची मदत ही अनमोल असून वंदनीय आहे‌. मानवाधिकार सुरक्षा ट्रस्टचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष महंमदयासिन शेख म्हणाले," वंचित घटकातील दिव्यांगांना आम्ही केलेली मदत कर्तव्यभावनेने केलेली असून समाजातील इतर घटकांनीही मदतीचा हात द्यावा".                                                                   आस्था संस्थेच्या कार्यालयात दहा निराधार दिव्यांग कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच साळशी येथील निराधार कुटुंबांना 15 असे एकूण 25 जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले.                        ‌                      कार्यक्रमाप्रसंगी  संजय पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय शिंदे ,उपाध्यक्ष महेश नंदे, शाहुवाडी तालुका अध्यक्ष संजय पाटील मिस्त्री, सचिव मानसिंग पाटील सह अपंग बांधव भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments