सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मानसिंग जाधव यांना सेवानिवृत्तीनिमित्ताने निरोप
सुनिल पाटील
संपादक, राधानगरी लाईव्ह
राधानगरी येथील राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे आपल्या ३१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतुन आज सेवानिवृत झाले असुन त्यांना अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या पोलीस दलातील रुहकार्यानी भावपुर्ण निरोप दिला.
राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मानसिंग जाधव हे मुळ कांडगांव येथील राहणारे असुन त्यांनी १९९० या साली पोलीस दलात आपल्या सेवेला सुरुवात केली.कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी विविध ठीकाणी आपली सेवा बजावली व दिनांक ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार ते राधानगरी येथून सेवानिवृत्त झाले. कोरोना संसर्गाच्या संकटात त्यांना पोलीस स्टेशनच्या आवारात आपल्या सहकार्यानी निरोप दिला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे विशेष काटेकोर पालन करण्यात आले.
याप्रसंगी राधानगरीचे पोलीस निरिक्षक उदय डुबल,तसेच ईतर पोलीस कर्मचाऱ्यानी त्यांना सेवानिवृतीपर निरोप दिला. यावेळी पोलीस निरिक्षक उदय डुबल यांच्या हस्ते मानसिंग जाधव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आला.
राधानगरी लाईव्ह न्यूज पोर्टल कडून "मानसिंग जाधव" सरांना त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा.
0 Comments