Ticker

6/recent/ticker-posts

रणजितदादा युवाशक्तीच्या वतीने मोफत जम्बो कोविड सेंटरची उभारणी

 संतोष मांडे (भुदरगड प्रतिनिधी )  ९४२०९३४०७६


  • सध्या कोरोना रुग्णांची संख्या शहरी भागासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनावर असणारा ताण आणि रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता राधानगरी भुदरगड चे लोकनेते के. पी. पाटील साहेब यांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे वाटचाल करणारे राजकारणात, समाजकारणात काम करत असताना व्यापक व सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून निस्वार्थ वृत्तीने झोकून देऊन समाजहितासाठी काम करण्याची शिकवण देणारे अभ्यासू व्यक्तिमत्व युवानेते रणजीतसिंह कृष्णराव पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली रणजितदादा युवाशक्तीच्या वतीने मोफत जम्बो कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. त्याची संपूर्ण तयारी झाली असून हे कोविड सेंटर शंभर बेडचे असून के.पी.पाटील पॉलिटेक्निक कॉलेज मुदाळ तिटा या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.हे कोविड सेंटर ३० मे पासून आपल्या सेवेसाठी सुरु होणार आहे. कोरोना सारख्या विषाणूला पराजीत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे तसेच या कोविड सेंटरला कोणाला मदत करायची इच्छा असेल अथवा सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था व ज्यांना रुग्णांची सेवा करायची असेल त्याचबरोबर आपल्या भागातील डॉक्टर, नर्स यांना याठिकाणी जॉईन व्हायचे असेल तर निश्चितच संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आले.यास समाजातील विविध स्तरातून प्रतिसादहि मिळत आहे .या कोविड सेंटरमध्ये संपूर्ण वैद्यकीय सेवा, औषधे ,जेवण, नाष्टा मोफत दिले जाणार आहे. तसेच रुग्णांना मानसिक आधारासाठी समुपदेशन दिले जाईल. वाचन करण्यासाठी ग्रंथालय,टिव्हीची सुविधा मोफत दिली जाणार आहे. या कोविड सेंटर मुळे राधानगरी- भुदरगड तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोरणाग्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे.


  • रुग्णसेवेत निस्वार्थ मनाने पुढाकार घेऊन अतिशय चांगला उपक्रम रणजितदादा युवाशक्तीने हाती घेतला आहे.
  •  वक्‍तृत्व , कर्तुत्व आणि संघर्षाची झालर असलेल्या नेहमी निस्वार्थ वृत्तीने समाजहितासाठी काम करणारे अभ्यासू युवा नेते रणजीतदादा पाटील यांच्या या कौतुकास्पद सामाजिक कार्याबद्दल जनतेतून समाधान आणि शुभेच्छाही व्यक्त होत आहेत.


Post a Comment

0 Comments