राधानगरी पंचायत समितीचा भोंगळ कारभार कागदावर डोळे मिटून सही.
सुनिल पाटील
संपादक, राधानगरी लाईव्ह
ग्रामसेवक ग्रामपंचायत तारळे खुर्द या ग्रामपंचायतला माहिती अधिकार कायदा 2005अतंर्गत अर्जदार श्री सुनील गणपती पाटील या नावे घरकुल योजनेचा दिनांक 30 4 2021 रोजी अर्ज केला होता. पण अर्जदार यांना पंचायत समितिकडून जो पत्रव्यवहार केला आहे तो पुर्णपणे चुकीचा आणि निष्काळजीपणाचा आहे. राधानगरी पंचायत समितीचे जन माहिती अधिकारी तथा विस्तार अधिकारी (सांख्यिकी) यांनी अर्जाची शहानिशा न करता अर्जदार यांचे नाव,पत्ता न पाहता मागील केलेल्या पत्रव्यवहाराची कॉपी पेस्ट करुन त्यावर डोळे झाकून सदरील विस्तार अधिकारी यांनी सही केली आहे.
टाईपराईटर,क्लार्क ने काय टाईप केले आहे याची शहानिशा विस्तार अधिकारी हे करत नाहीत असे वाटते, तेव्हा गटविकास अधिकारी आपनास विनंती आहे की, आपण जनतेचा पगार जर घेत असाल तर आपल्या हाताखालील अधिकारी,कर्मचारीच काय काम करतात ते पहा फक्त शासन पगार देतो म्हणून तुम्ही फक्त रोजंदारी माणसाच्या गतीने फक्त पाट्या टाकायचे काम करू नका, तसेच या अधिकारी व कर्मचारी वर्गावर योग्य ती कारवाई करा आणि इथून पुढे तरी डोळे उघडून कागदावर सह्या करण्याचे आदेश द्या.

0 Comments