Ticker

6/recent/ticker-posts

चंदगडमधील बहूचर्चीत ट्रामा केअर हॉस्पिटलसाठीच्या जागेची आमदार राजेश पाटील यांच्याकडून पाहणी

 चंदगडमधील बहूचर्चीत ट्रामा केअर हॉस्पिटलसाठीच्या जागेची आमदार राजेश पाटील यांच्याकडून पाहणी 

नारायण शिरोळकर (चंदगड चंदगडपरतिनीधी) 




चंदगड तालुका म्हणजे महाराष्ट्राच शेवटच टोक दुर्गम आणि मागास अशी तालुक्याची ओळख. अपुर्‍या आरोग्य सुविधा त्यामूळे कायमच तालुक्यातील लोकांना बेळगाव किंवा गडहिंग्लजवर विसंबून रहाव लागत ही स्थिती आजही जैसे थे आहे. चंदगड तालुक्यात स्वताची हक्काची बाजारपेठ असावी आणि तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज ट्राॅमा केअर सेंटर असाव अशी तालुक्यातील जनतेची मुख्य मागणी त्यासाठी चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा हे ठिकाण देखील निश्चीत करण्यात आल मात्र या दोन्हीही प्रश्नांची सोडवणूक अद्याप होवू शकलेली नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख खा.शरदचंद्रजी पवार आणि त्यांच्या कन्या खा.सुप्रिया सुळे या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असताना एका चंदगडी पठ्ठ्याने 'पवार साहेब चंदगड तालुक्यात सुसज्ज ट्राॅमा केअर सेंटर व्हाव आणि त्याच उद्घाटन आपल्याच हस्ते व्हाव' अशी कमेंट केली याला उत्तर देताना खा.शरद पवार यांनी तुमच्या तालुक्याचे आमदार चांगल काम करत आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न  मार्गी लावू अस त्यावेळी अश्वस्थ केल पण कालांतराने कोरोना महामारीमूळे हा प्रश्न तसाच मागे पडला.

याच पार्श्वभुमिवर चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी पाटणे फाटा येथील रखडलेल्या ट्राॅमा केअर हॉस्पिटलसाठीच्या जागेची पाहणी एम.आय.डी.सी रीजनल अधिकरी धनंजय इंगळे यांच्या सोबत केली तसेच त्यांनी सदर जागा येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे यासंबंधी पाठपुरावा केला जाईल व प्रत्यक्ष बांधकाम कामाला ऑक्टोबर -नोव्हेंबर मध्ये सुरुवात करण्यात येईल अशी माहीती दिली. यावेळी चंदगडचे तहसीलदार विनोद रनवरे, बीडीओ बोडरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साने, तानाजी गडकरी,पांडुरंग बेनके व अधिकारी उपस्थित होते.

येणार्‍या काळात चंदगड तालुक्यात सुसज्ज ट्र्राॅमा केअर हॉस्पिटल होवून जनतेची बेळगाव आणि गडहिंग्लजची चांगल्या आरोग्य सुविधांसाठी होणारी पायपीट थांबेल अशी अपेक्षा आता चंदगडी जनतेतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments