*ताराराणी संस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*. *सचिन पाटील सर ( खिंडी व्हरवडे वार्ताहर)* 

 



म्हाकवे ता. कागल येथील पुरस्कृत ताराराणी सेवाभावी संस्थेने कागल तालुक्यातील 75 महिला बचत गटांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले . गेली पंधरा वर्षे संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. गेल्या वर्षीपासून सॅनिटायझर व मास्क वाटप आधी विविध उपक्रम राबवले गेले . त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी महिला बचत गटातील सभासदांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात अनेक गरजू कुटुंबांना याचा उपयोग होणार आहे. या महिलांना संस्थेच्या वतीनेजीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याची माहिती संस्थेचे प्रमुख श्री शामराव पाटील म्हाकवे कर यांनी दिली. बस्तवडे येथील बचत गटांना मदतीचे वाटप प्रसंगी संस्थेचे प्रमुख शामराव पाटील , एनजीओ संग्राम पाटील, अभिजित पाटील , सिद्धराम पाटील सागर पाटील ,दीपक तांबेकर नंदा कांबळे ,नंदा माने आदी उपस्थित होते.