प्रतिनिधी,
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा
सांगली.
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी तालुक्यातील रुग्णसंख्या, उपलब्ध असलेले बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा साठा, लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. जत तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरीने प्रयत्न करत आहे.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज करण्याचे तसेच माडग्याळ येथील हॉस्पिटल सुरू करण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रशासनाने रुग्णांची इथेच व्यवस्था करून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्याचा प्रयत्न करावा.
ज्या गावात १५ पेक्षा अधिक रुग्ण असतील त्या गावात कठोर निर्बंध करावेत. आरोग्य सेवक, आशा वर्कर्स यांच्यावर दमदाटी करणाऱ्यांविरोधात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याबाबत कठोर कारवाई करावी. तसेच तालुक्यातील लस उपलब्धीनुसार लसीकरण मोहीम राबवावी अशा सुचना केल्या.
0 Comments