Ticker

6/recent/ticker-posts

चंदगड नगरपंचायतीसाठी नगरविकास खात्याकडून २० लाख रुपये निधी मंजूर- संग्रामसिंह कुपेकर

 चंदगड नगरपंचायतीसाठी नगरविकास खात्याकडून २० लाख रुपये निधी मंजूर- संग्रामसिंह कुपेकर 



नारायण शिरोळकर ( चंदगड प्रतिनीधी) 


नगरविकास खात्याचे मंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांच्या "नगरपंचायतीना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान" या योजनेअंतर्गत निधी मधून चंदगड नगरपंचायती च्या वार्ड क्र ६,७,१२,१३ या वार्डच्या विकासासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे चंदगड विधानसभा संघटक संग्रामसिंह कुपेकर यांनी दिली यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख विजयराव देवणे यांचे सहकार्य मिळाले असे संग्रामसिंह कुपेकर यांनी याप्रसंगी बोलताना सांगीतले.

महाराष्र्ट शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून राज्यातील नगरपंचायतींना वैषीष्ठपूर्ण कामासाठी विषेश अनुदान देण्यात येते. चंदगड शहराची व्याप्ती वाढत असल्याने या निधीमूळे शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याने चंदगडवासीयांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments