कावणे येथील नाले व गटारांची सफाई
सागर कांबळे (कावणे परतिनिधी )
येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे.त्यामुळे मान्सूनपूर्व अनेक कामांना वेग आला आहे. मात्र तोक्तते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये पावसाचे आगमन आधीच झाले. शेतकऱ्यांची अनेक कामे त्यामुळे खोळंबली आहेत. पेरणीपूर्वी मशागती थांबलेल्या आहेत.
मुंबई येथे 2005 सालच्या महापुराचे एक कारण नाले सफाई न केल्यामुळे महापूर आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी नाले व गटारांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम राबवली जाते.
करवीर तालुक्यातील कावणे या गावी बुधवार पासून नाले व गटारांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या कामाबद्दल गावामध्ये सरपंच, सदस्य आणि कर्मचाऱ्यांचे गावात कौतुक होत आहे.या प्रसंगी कावणे गावचे लोकनियुक्त सरपंच सुनिल टिपूगडे ,उपसरपंच बाळासो चौगले, सामाजिक कार्यकर्ते विनायक पाटील, संतोष पाटील,काशिनाथ कुंभार, राजेंद्र लोहार संभाजी कांबळे,माजी सदस्य साताप्पा लोहार ,वसंत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारीआदी उपस्थित होते.

0 Comments