Ticker

6/recent/ticker-posts

*गुडाळ मधील सामाजिक कार्यकर्ते श्री एम एल कांबळे व श्री राम कांबळे यांचे कडून कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप*. श्री सचिन पाटील (खिंडी व्हरवडे प्रतिनिधी).

 


गुडाळ मधील सामाजिक कार्यकर्ते श्री एम एल कांबळे व श्री राम कांबळे यांचे कडून कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप*. श्री सचिन पाटील (खिंडी व्हरवडे प्रतिनिधी).

 गुडाळ ता. राधानगरी येथील गेले महिनाभर चालू असलेली कोरोना परिस्थिती आता आटोक्यात येत आहे.तरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्य हेतुतून गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री.एम एल कांबळे व श्री राम कांबळे यांचे कडून कोरोना प्रतिबंधक साहित्य मास्क, रोग प्रतिकारक शक्ती गोळ्या वाटप व जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली. या स्तुत्य उपक्रमात गावचे माजी सरपंच श्री अभिजीत पाटील , उपसरपंच श्री दत्तात्रय कोथळकर , साताप्पा पाटील सर, दिनकर कांबळे , सतीश गुडाळकर, संजय कांबळे, सागर कांबळे, सचिन कांबळे ,पत्रकार उदय कांबळे उपस्थित होते. या उपक्रमास साताप्पा कांबळे, आनंदा कांबळे , सदाशिव कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments