Ticker

6/recent/ticker-posts

गारगोटी कोविड सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पि.पि.ई किटचे वाटप

 गारगोटी कोविड सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पि.पि.ई किटचे वाटप

 संतोष मांडे
भुदरगड प्रतिनिधी

शासनाच्या माध्यमातून चालविलेले मौनी विद्यापीठातील गारगोटी कोविड सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पि.पि.ई किटचे वाटप केले. आजच्या कोरोना महामारीच्या संकटकालीन परिस्थितीत गारगोटी कोविड सेंटर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जवळजवळ तिनशे ते चारशे कपँसिटी असणारे जिल्ह्यातील सर्वात मोठे सेंटर म्हणून गारगोटी कोविड सेंटरकडे बघितले जाते. हे सेंटर आता भुदरगड तालुक्या बरोबर जिल्ह्यातील अनेक कोरोना रुग्णांना नव संजीवनी देत आहे. त्याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त़ होत आहे.
            राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सेंटरला भेट दिल्यानंतर तिथे काम करीत असलेल्या डॉक्टरना पि.पि.ई किटचे वाटप केले. याप्रसंगी खासकरून राधानगरी-भुदरगड -आजरा मतदार संघाचे युवा नेते व नुकत्याच झालेल्या गोकुळ संघाच्या निवडणुकीत निवडून आलेले रणजितसिंह कृष्णराव पाटील दादा उपस्थित होते. कोविड सेंटरमधे काम करणाऱ्या आणि पेशंटची काळजी घेणारे डॉक्टर, परिचारिका, सेवकांचे मनापासून आभार व्यक्त केले. तसेच यावेळी गारगोटी शहर व शहराभाहेरील रुग्णांना आसरा देणारे आणि विश्वासाचे व आपुलकीचे नाते निर्माण करणारे डॉ. मिलिंद कदम यांचे बद्दल कौतुकाचे बोल ऐकायला मिळत होते.
            मौनी विद्यापीठातील गारगोटी कोविड सेंटर येथील योग्य नियोजन, वेळेवर जेवण, पेशंटच्या राहण्याची सुविधा व  वेळेत दिला जाणारा उपचारा साठी नेहमी आग्रेसर असणारे डॉक्टर व त्यांच्या टिमचे करित असलेल्या  कार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.      
                   यावेळी गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील दादा,तालुका अध्यक्ष विश्व़नाथ कुंभार, युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब जाधव, शहर अध्यक्ष शरद मोरे,अजित देसाई, भालचंद्र कलकुटकी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments