प्रतिनिधी,
प्रमोद चिनके.
सांगली जिल्हा,
*शहरातील सर्व कोविड हॉस्पिटलचे फायर ऑडिट करा...!*मयुर पवार* कोरोना महामारी च्या काळात प्रशासनाने घालतेल्या नियमांचे पालन करत सामाजिक कार्यकर्ते मयुर पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सरकारी व खासगी covid हॉस्पिटल चे फायर ऑडिट करण्या बाबत निवेदन आयुक्त राजेश पाटील यांना ई-मेल द्वारे दिले .
निवेदनात असे नमूद केले की वसई विरार येथील हॉस्पिटल ला आग आणि नाशिक येथील oxygen गळती अशा दुर्घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडू नयेत याकरिता खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सरकारी व खासगी covid हॉस्पिटल चे फायर ऑडिट करावे अशी विनंती केली.
पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सरकारी व खासगी covid हॉस्पिटल मध्ये सध्या या corona महामारीच्या काळात अनेक पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार चालू आहेत .परंतु काही गरजेच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊन वसई विरार व नाशिक सारखी दुर्घटना शहरात होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सरकारी व खासगी covid हॉस्पिटल चे फायर ऑडिट करावे अशी मागणी केली.
0 Comments