Ticker

6/recent/ticker-posts

सांगली जिल्ह्यासह राज्यातील सर्वच माध्यमाच्या शिक्षकांच्या वैयक्तिक व सामूहिक समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कटिबद्ध....!

सांगली जिल्ह्यासह राज्यातील सर्वच माध्यमाच्या शिक्षकांच्या वैयक्तिक व सामूहिक समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कटिबद्ध....!

प्रमोद चिनके. 
सांगली जिल्ह्य प्रतिनिधी,
सांगली.
९४०५५५५५५७

सांगली(प्रतिनिधी)
     सांगली जिल्ह्यासह राज्यातील सर्वच माध्यमाच्या शिक्षकांच्या वैयक्तिक व सामूहिक समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कटिबद्ध आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी केले.
सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या ऑनलाइन बैठकीत ते बोलत होते य.या बैठकीस राज्य सरचिटणीस रमेश चौगुले,राज्य समन्वयक नितीन चौधरी,मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
 यावेळी शिक्षक सेना सांगली जिल्हाध्यक्ष भूषण भासर यांनी शाळा तेथे शिक्षक सैनिक निर्माण करण्याची ग्वाही दिली.शिक्षक व शिक्षकांच्या कुटुंबीयांना विमासंरक्षण मिॆळावे. सावित्री फातिमा कॅशलेस आरोग्य योजना तातडीने सुरू करून त्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश करावा.नॉन क्रिमीलेअरची मर्यादा वाढवून 16 लाखापर्यंत करावी.डी.सी. पी.एस.मृत झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना शासनाने लाभ घ्यावा.जुनी पेन्शन योजना लागू करावी.विद्यार्थी आधारित शिक्षकांच्या मूल्यमापनाचा घाट थांबवावा.शिक्षकांचे पगार एक ते पाच तारखेपर्यंत व्हावेत.अशी मागणी विलासराव आपटे यांनी केली. शिक्षकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातून प्रशांत कांबळे,धनाजी बारवडे,महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा माळी,संजय बुचडे,प्रभाकर ऐवळे, संदीप जाधव आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.यावेळी सर्वांनी तालुक्याच्या समस्या मांडल्या.आभार भूषण भासर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments