Ticker

6/recent/ticker-posts

खा. संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात दलित, बहुजनांना सहभागी करून घ्या..... प्रा. शहाजी कांबळे*

 *

*मराठा आरक्षण लढ्यात आंबेडकरवादी जनता पाठीशी राहणार.*

 कोल्हापूर दि. २४ मे/२०२१

     





    सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला संविधानिक तत्वानुसार स्थगिती दिली आहे. तरीही महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जनरेट्याचा दबाव आणण्याची आवश्यकता आहे. म्हणून मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी करण्यासाठी न्याय-हक्काचे दीर्घ लढे यशस्वी करण्याचा अनुभव असणाऱ्या दलित-बहुजन आंबेडकरवाद्यांना सहभागी करुन घ्यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांनी ऐतिहासिक शाहू स्मृतिस्थळ येथे केले.

       मराठा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्र दौऱ्याला निघण्याची सुरवात खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती शाहू स्मृतिस्थळ, नर्सरी बाग, सिद्धार्थनगर कोल्हापूर येथे शाहू महाराज यांचे आशीर्वाद घेऊन केली यावेळी ते बोलत होते.

     यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, महाराष्ट्रातील बारा बलुतेदारांना सोबत घेऊन मराठा आरक्षणाचा लढा पुढे नेणार. छत्रपती शाहू महाराज यांच्या शाहू स्मृती स्थळापासून ऊर्जा घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करणार असून या दौर्‍यात मराठा नेते, कायदेतज्ञ, अभ्यासू आणि बहुजन समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहे. तसेच कोरोनाच्या या कठीण काळात जगणे जास्त महत्वाचे असून आंदोलनासाठी कार्यकर्त्यांच्या जीवाशी न खेळता अभ्यासू पद्धतीने हा लढा पुढे न्हेणार असल्याचे प्रतिपादन हि यावेळेस संभाजीराजे यांनी केले. 

        याप्रसंगी प्रा. कांबळे यांच्यासह विविध पक्ष, संघटनांच्या प्रमुखांनी अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त, इतर मागास (OBC), धार्मिक अल्पसंख्यांक समाजाच्या आरक्षणास धक्का न लागता, मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीकरिता लढा उभा करताना सर्व दलित-बहुजन समाज, आंबेडकरवादी पक्ष, संघटना पूर्ण ताकदीनिशी या लढ्यात मराठा समाजाच्या पाठीशी राहण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासन आज मराठा आरक्षण लढ्याचे प्रणेते खा. संभाजीराजे छत्रपती यांना दिले.

        यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे सर, रिपब्लीकन पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तमदादा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव रूपाताई वायदंडे, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, ओबीसी नेते दिगंबर लोहार, बौद्ध चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुशीलकुमार कोल्हटकर, आंबेडकरवादी नेते वसंत लिंगनूरकर, सिद्धार्थ नगर अध्यक्ष माळी साहेब, तकदीर कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments