तालुकाकोरोना मुक्त करण्यासाठी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करा :- आ प्रकाश आबिटकर
विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने होणार जप्त पोलिस प्रशासनाचा इशारा
भुदरगड प्रतिनिधी
बाळासाहेब बोडके
राधानगरी तालुक्यात कोरोना स्थिती आवाक्यात आहे, तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल करण्यासाठीजिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या शनिवारी मध्यरात्री नंतरच्या संपूर्ण जिल्हा बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी रराधानगरी तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला दिल्या,यावेळी आमदार अबीटकर यांनी दोन्ही कोविड सेंटरणा भेटी देऊन आढावा घेतला. संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवार दिनांक 15 ते 23 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या बंद मध्ये आरोग्य सेवा मेडिकल आणि दूध सेवा वगळता सर्वत्र कडकडीत बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आबिटकर यांनी आज राधानगरी इथल्या कोवीड सेंटरला भेट देऊन रुग्णांचा उपचाराचा संदर्भात आरोग्य यंत्रणेला सूचना केल्या, तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात तहसीलदार मीना निंबाळकर पोलीस निरीक्षक उदय डुबल, गट विकास अधिकारी संदीप भंडारी,वैद्यकीय अधीक्षक डॉ गणपती गवळी, तालुका आरोग्य अधिकारी आर आर शेट्टी, आदींच्या समवेत आढावा बैठक पार पडली यावेळी 18 ते 45 वयोगटातील व्यक्तीना तालुक्यात किमान एक तरी लसीकरण केंद्र उपलब्ध करावे अशी मागणी आरोग्य अधिकारी आर आर शेट्टी यांनी केली, संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णांसाठी किमान २५ ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी,ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला जनरेटर द्यावे,रिक्त असणाऱ्या परिचारिकांची सहा पदे भरावीत आदी मागण्या आरोग्य अधीक्षक डॉ गणपती गवळी यांनी केली.
लॉकडाऊन संदर्भात काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी स्थानिक ग्राम समित्या ,पोलीस पाटील, ग्रामसेवक ,तलाठी यांना सक्रिय होण्यासाठी योग्य त्या सूचना देण्याबाबत आदेश काढण्याच्या सूचना देण्यात आल्या, तालुक्यात ४२ पदवीधर तर २३ बोगस डॉक्टर वैधकीय व्यवसाय करत आहेत,काही डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे शिवाय त्यांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागला आहे याची गंभीर दखल घेऊन अशा बोगस आणि चुकीचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या वर तात्काळ फौजदारी कारवाई करावी असे आदेश आमदार अबीटकर यांनी आरोग्य विभागाला देत,शनिवारी १५ रोजी तालुक्यातील सर्व वैधकीय व्यवसायिकांची मार्गदर्शन बैठक घेण्याची सूचनाही देण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांची वाहने जप्त करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी यावेळी सांगितलं, यावेळी नायब तहसीलदार विजय जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित पाटील, शाखा अभियंता शैलेश मोरस्कर, आरोग्य विस्तार अधिकारी आर एस पाटील, जयवंत कोरे, रंजना लोहार,गुप्त वार्ता विभागाचे कृष्णात यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
0 Comments