Ticker

6/recent/ticker-posts

चंदगडला गोकुळ दुध उत्पादक संघाच्या स्विकृत संचालक पदाचा मान मिळावा - संभाजीराव देसाई शिरोलीकर नारायण शिरोळकर (चंदगड प्रतिनिधी) :



चंदगडला गोकुळ दुध उत्पादक संघाच्या स्विकृत संचालक पदाचा मान मिळावा - संभाजीराव देसाई शिरोलीकर 


नारायण शिरोळकर (चंदगड प्रतिनिधी) :




तावरेवाडी (ता.चंदगड)  या गोकुळ दुध   संघाच्या चिलींग सेंटर कार्यालयात गोकुळच्या नवनिर्वाचीत अध्यक्षांसह नवनिर्वाचीत संचालक मंडळाचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी चंदगड काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई शिरोलीकर यांच्या हस्ते गोकुळ दुध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी बोलताना चंदगड काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई शिरोलीकर म्हणाले की, चंदगड मधील दुधाची प्रत आणि दुधाचे संकलन पहाता चंदगडला गोकुळ दुध संघाच्या स्विकृत संचालक पदाचा मान पहिल्यांदा मिळावा तरच आपण तालुक्यातील दुध उत्पादक शेतकर्‍याला खर्‍या अर्थाने न्याय देवू शकू आणि तरच चंदगडच्या दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला जादा दर आणि दुध उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळेल अस मनोगत त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केल.

यावेळी गोकुळ दुध उत्पादक संघाचे नवनियुक्त चेअरमन विश्वासराव पाटील यांनी यावर योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतला जाइल अस उपस्थितांना आश्वासीत केल. यावेळी या कार्यक्रमाला चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील, गोकुळ दुध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील, नुतन संचालीका अंजनाताई रेडेकर यांच्यासह उदय देसाई, भिकू गावडे, नामदेव नार्वेकर, जनार्दन देसाई, सागर पाटील, प्रदिप पाटील, विलास पाटील, कल्लाप्पा भोगण तसेच जे.के. पाटील कोल्हापूरहून खास आवर्जून उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments