Ticker

6/recent/ticker-posts

भुदरगड तालुक्यातील लोकांनाच ऑफलाईन पध्दतीने कोरोना लस देण्यासाठी गारगोटी ग्रामपंचायतीने तहसिलदार भुदरगड यांना दिले निवेदन.

भुदरगड तालुक्यातील लोकांनाच ऑफलाईन पध्दतीने कोरोना लस देण्यासाठी गारगोटी ग्रामपंचायतीने तहसिलदार भुदरगड यांना दिले निवेदन.

बाळासाहेब बोडके
भुदरगड ( प्रतिनिधी) -
     
 सध्या शासनाने १८ वर्षावरील लोकांना लस देण्याचे कार्य सुरु केले आहे. ऑनलाईन  रजिस्ट्रेशन केल्यानंतर ही लस दिली जाते. ऑनलाईन रजिस्टे्रेशन करून भुदरगड तालुका बाहेरचे लोक गाड्या करून गारगोटी च्या ग्रामीण रुग्णालयात गर्दि करत आहेत.त्यामूळे तालुक्यातील लोकांना कोवँक्सीन लस अपुरी पडत आहे.यासाठी भुदरगड तालुक्यातील लोकांसाठी आलेली  कोव्हँक्सीन लस ऑफलाईन पध्दतीने भुदरगड तालुक्यातीलच लोकांना द्यावी यासाठीचे लेखी निवेदन गारगोटी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार भुदरगड यांना ग्रामस्थांच्या वतीने दिले.
     या निवेदनात असे म्हटले आहे की,गारगोटी शहरात कोरोनाचे पेशंट वाढत आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे १८ वर्षावरील लोकांना ही लस देणे गरजेचे आहे त्यास अनुसरून ही लस गारगोटी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन फॉर्म भरून ही लस दिली जाते मात्र तालुक्याचा सर्वच भाग हा ग्रामीण स्वरूपाचा असल्याने ग्रामस्थांना ऑनलाईन फॉर्म भरणे शक्य होत नाही.तालुक्यातील  लोक अशिक्षित, गरीब, सर्वसामांन्य मजूर शेतकरी वर्गातील आहेत.अशा नागरिकांना ऑनलाईन फॉर्म भरून, गारगोटी सोडून बाहेर पैसे खर्च करून ही लस घेण्यासाठी जाणे कदापीही शक्य नाही.त्यामूळे भुदरगड तालुक्याती लोकांना ऑफलाईन पध्दतीने आधार कार्ड नोंदवून घेवून ही लस प्रथम प्राधान्याने  द्यावी.'
    गारगोटी च्या या ग्रामीण रुग्णालयामध्ये कोव्हँक्सीन लस घेण्यासाठी कोल्हापूर, गांधीनगर, उचगांव व कोकण भागातून लोक येत आहेत.ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यामूळे या बाहेरगावच्या लोकांना ही लस दिली जात आहे आणि भुदरगड तालुक्यातील लोकांना यामूळे लसीचा तुटवडा झाल्याने  वंचित राहावे लागत आहे.अशा या बाहेरगावच्या लोकामूळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची आणखीन भिती वाढली आहे.लसीचा तुटवडा वाढत चालला आहे.यासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पध्दतीने आधार कार्ड नोंदवून घेवून भुदरगड तालुक्यातील व गारगोटी शहरातील लोकांना प्राधान्याने लस देणेत यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.निवेदनात पुढे असे म्हटले आहे की तालुका बाहेरील लोकांना लस देणे बंद करावे,ज्या त्या गावात लस देण्यासाठी संबंधित कार्यालयांना लस उपलब्ध करून तशा  सुचना कराव्यात अंन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा ईशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.या निवेदनाच्या प्रती प्रांत भुदरगड-आजरा, गटविकास अधिकारी पंचायत समिती भुदरगड, पोलीस निरिक्षक भुदरगड व तालुका वैद्यकिय अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.हे निवेदन देताना गारगोटी चे लोकनियुक्त सरपंच संदेश भोपळे, ग्रा प सदस्य प्रकाश वास्कर, विजय काटकर,माजी  सरपंच राजु काझी, सुधिर वणे मयुर पाटील जितेंद्र भाट, संजय देसाई ,अजित देसाई,मनोज कांबळे,विजय भाट, अजित देसाई,संपत देसाई,संग्रामसिंह पोफळे, शैलेश सावंत,यांचेसह तरूण युवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments