आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी ऑक्सिजन निर्मिती प्लान्टसाठी सांगली सिव्हीलला दिले तब्बल १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयेचा निधी.....!
प्रतिनिधी,
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा,
आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपल्या स्थानिक विकास निधी मधून पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालया साठी ५ ऑक्सिजन व्हेंटिलेटर तसेच ऑक्सीजन निर्मिती प्लांट उभारण्यासाठी एकूण१ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचे पत्र त्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी भाजपचे नेते नगरसेवक शेखर इनामदार उपस्थित होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे त्यामुळे सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे हे लक्षात घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी निधी देण्याचा निर्णय घेतला. सध्या कोरोना ची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. यामध्ये रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे अचानक ऑक्सिजन कमी होण्याचे प्रकार घडत असल्यामुळे तातडीने ऑक्सिजन पुरवठा करावा लागत आहे मात्र त्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर कोरोनाच्या महामारीमध्ये व्हेंटिलेटरचीही कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निधीतून २६ लाख ५० हजार रुपयांचे पाच व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी भाजपचे नेते नगरसेवक शेखर इनामदार, गणपती साळुंखे, मकरंद म्हामुलकर आदि इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments