Ticker

6/recent/ticker-posts

त्या पाच तरुणी धडपडताहेत रुग्णांच्या व नातेवाईकांच्या सेवेसाठी;दानशूर व्यक्तिंकडून मदतीचे अवाहन.





त्या पाच तरुणी  धडपडताहेत रुग्णांच्या व नातेवाईकांच्या सेवेसाठी;दानशूर व्यक्तिंकडून मदतीचे अवाहन.

राधानगरी लाईव्ह विषेश न्यूज

 मिळालेल्या पॉकेटमनी मधून पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम खाण्याची त्यांची सवय. पण एक दिवस कोविंड लसीकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठवल्यानंतर त्यांची वैचारिक दिशाच बदलून गेली. गरीब पेशंटची व त्यांच्या नातेवाईकांची या लॉक डाऊनच्या काळात होणारी धावपळ व पोटाचे होणारे हाल पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांच्या समोर अशा लोकांसाठी रोजच्या नाश्त्यासाठी आपण काहीतरी करूया असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दर्शवला. स्वतःच्या पॉकेटमनी मधून रोज सकाळी घरी बनवलेल्या सकस नाश्ता रुग्णांना व नातेवाईकांना देण्याचे त्यांनी ठरवले व त्याची सुरुवात आजच सकाळी सात वाजल्यापासून सीपीआर येथे सुरू केली. दुधाळी- हरीमंदिर  परिसरातील या पाच मुलींची नावे आहेत श्रुती चौगुले, अर्पिता राऊत, आचल कट्यारे, श्रेया चौगुले व नेहा पाटील.

    रोजच्या शंभर प्लेटच्या नाश्त्याचा खर्च व पॉकिटमनी यांचा ताळमेळ करताना त्यांना कसरत करावी लागत आहे. तसेच कोरोना संसर्गाचे भीतीने सामान्य माणूस सुद्धा कोविंड हॉस्पिटल येथे जाण्यास कचरतात, त्यामुळे सुरुवातीला घरच्यांनी सुद्धा त्यांना विरोध केला. पण  त्यांची धडपड पाहून  त्यांच्या प्रत्येकाच्या घरचेही आता या उपक्रमांमध्ये सामील झाले आहेत. आपल्या मुलींचे सर्व समाजातून होत असलेले कौतुक या पालकांसाठी अभिमानाची गोष्ट ठरत आहे .  आता या उपक्रमाची व्याप्ती शहरातील प्रत्येक रुग्णालयापर्यंत  पोहोचण्याचा माणस या पाच मुलींचा आहे. पण त्यासाठी लागणारे प्रचंड मनुष्यबळ व पैसा यासाठी त्यांची ओढातान  होत आहे. पण त्यामुळे धीर न सोडता हा उपक्रम चालू ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. समाजातील दानशूर व्यक्तींना या उपक्रमास  पाठबळ देण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे. 

     आपणही या उपक्रमास मदत करू शकता किंवा यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकता . यासाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा
श्रुती – 771 99 61 547 , अर्पिता – 772 08 33 837
ही बातमी जास्तीत जास्त फॉरवर्ड/शेअर करून या उपक्रमास  पाठबळ द्यावे ही विनंती. 

Post a Comment

0 Comments