प्रतिनिधी,
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा,
सांगली.
शेड्याळ गावात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे कोरोनाचे 10 रुग्ण गावात सापडलेले आहेत सर्व रुग्ण ना होमकाॅरंटाईन करण्यात आलेले आहेत हे सर्व रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग यांच्या नियंत्रणाखाली खाली आहेत सर्व रुग्णांच्या तब्येती मध्ये चांगली सुधारणा होत आहेत त्यांना वेळेवर औषध उपचार मिळत आहे..
व गावात कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भात तातडीने आज कोरोणा संदर्भात कमिटीची मीटिंग बोलवण्यात आली.. व तातडीने गावात औषध फवारणी करण्यात आली.. व सामाजिक कार्यकर्ते श्रीधर जमशेट्टी यांच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले.. ज्या परिसरात रुग्ण सापडले आहेत त्या परिसरात औषध फवारणी करून सर्व आजूबाजू परिसर परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केली.. कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांना वेळेवर औषध उपचार मिळवून देणे व त्यांना सर्व रुग्णांना मानसिक आधार देणे.. यासंदर्भात ग्रामपंचायत च्या वतीने सर्व सहकार्य या रुग्णांना करत आहेत..
व गावांमध्ये 18 वर्षावरील सर्व तरुण युवक ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी लस घेण्यासंदर्भात जनजागृती विनंती आवाहन करत आहोत.. गावामध्ये एक दिवस मोफतच लस कॅम्प आयोजित करण्यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग यांना विनंती करण्यात आलेला आहे असे पत्र ग्रामपंचायत कडून देण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली... पुढील काळात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढल्यास काय उपाय योजना कराव्यात या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली..
यावेळी या कमिटीचे अध्यक्ष तथा सरपंच अशोक जाधव. उपसरपंच भगवानदास केंगार. ग्रामपंचायत सदस्य कर्यापा गुगवाड . ग्रामसेवक कादरखान नदाफ कृषी अधिकारी जी एस हालकुंडे या कमिटीचे सदस्य शंकर गुगवाड. पोलीस पाटील सुनीता जाधव. आरोग्य सेवेचे आशा वर्कर्स अनिता जाधव. अंगणवाडी सेविका अहिल्याबाई सातपुते. कोतवाल अनिता जाधव. ग्रामपंचायत कर्मचारी बीराप्पा जावीर शंभू कसबे आणी इतर मान्यवर उपस्थित होते..
0 Comments