सांगली-: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना पुण्यातिल अल्ट्रान कंपनी आणि कॅम फाउंडेशन कडून हे किट देण्यात आले.
सफाई कर्मचाऱ्यांना नाले,रस्ते,झाडे झुडपे इ. ठीकाणी स्वच्छता करत असताना त्यांचा आरोग्याला इजा पोहचु नये म्हणून मास्क,गमबुट,हातमोजे यांचे वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम मध्ये प्रभाग समिती क्रमांक एकच्या सफाई कर्मचाऱ्यांना या सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.यावेळी फाउंडेशनचे सुनील पवार,राकेश पवार स्वच्छता निरीक्षक एस.यु.बारगिर,किशोर कांबळे,प्रणिल माने,वैभव कुदळे,धनंजय कांबळे आदी उपस्थित होते.
पुढील चार दिवस प्रभाग निहाय वाटप केले जाणार आहे. मनपा आयुक्त मा. नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे.

0 Comments