सचिन पाटील सर (खिंडी व्हरवडे प्रतिनिधी)
महापूर असो वा कोरोना सहकार्य करण्यासाठी पहिल्यांदा प्रशासना मधून पुढे येणारा घटक म्हणजे प्राथमिक शिक्षक.... मागील लॉकडाऊन मध्ये मुख्यमंत्री सहायता निधी, जिल्हा पातळीवरील मदत, तालुक्यातील मदत आणि आता उणे पुरे एक वर्ष ही झाले नाहीत तोपर्यंत पुन्हा मुख्यमंत्री सहायता, जिल्हापातळीवर आणि तालुक्यात पुन्हा मदत..... शाहू महाराजांचा वसा वारसा लाभलेल्या राधानगरी भूमीत दातृत्वाची कमतरता कधीच नव्हती, कधीच नसेल. घर ते घर सर्वेक्षण, व्हॅक्सिनेशन रजिस्ट्रेशन, रुग्णांना समुपदेशन, लसीकरण सेंटर वरील विविध कामे ते चेक नाका ड्युटी..... यासोबत ऑनलाईन अध्यापनाचं काम करत करत दुसऱ्या बाजूला अशी दातृत्वाची भूमिका बजावत आहे..... गेले कित्येक दिवस राधानगरी कोविड सेंटर मधील लोकांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती. ही कमतरता लक्षात घेऊन राधानगरी तालुक्यातील शिक्षक परिवाराच्या वतीने कोविड सेंटरसाठी 15 जम्बो ऑक्सीजन सिलेंडर प्रधान करण्यात आली. या ऑक्सीजन सिलेंडर मुळे कोविड रुग्णांना दिलासा मिळाला आहे. यावेळी राधानगरीचे प्रांताधिकारी प्रधान साहेब, तहसीलदार निंबाळकर मॅडम, गटविकास अधिकारी डॉ. भंडारी साहेब, नायब तहसीलदार विजय जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शेट्टी साहेब, गटशिक्षणाधिकारी कासार साहेब शिक्षण विस्तार अधिकारी कुंभार साहेब,पाटील साहेब, तळेकर साहेब, पंचायत समिती सदस्य आर.के.मोरे, शिवाजी पाटील, बी.एस.पाटील, आनंदा सावर्डेकर एम.पी.शिंदे, डी.पी.पाटील, संतोष भोसले,पंडित पाटील, बाजीराव पाटील, सागर कांबळे, सर्जेराव ढेरे,अशोक एरूडकर,मंगेश धनवडे,बी.एस. पोवार,श्रीकांत कलिकत्ते, मधुकर मुसळे,शाहू चौगुले, राजेंद्र पाटील, गिरीश प्रभू व पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments