Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी बिद्रीत रक्तदान शिबीर संपन्न

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी बिद्रीत रक्तदान शिबीर संपन्न

कागल प्रतिनिधी
विजय कांबळे

राज्याचे ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त बिद्री ( ता. कागल ) येथे आयोजित केलेल्या  शिबीरात २२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.कोरोना महामारीच्या काळात रक्तपेढ्यांमधून रुग्णांना रक्ताची टंचाई भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर कागल विधानसभा मतदारसंघात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
                        बिद्री - बोरवडे जि.प. मतदारसंघातील रक्तदात्यांसाठी बिद्री साखर कारखान्यावरील कामगार भवनच्या सभागृहात रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी २२१ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य मनोज फराकटे,बिद्रीचे माजी संचालक डी.एम. चौगले यांच्यासह मान्यवरांनी रक्तदान केले.
                         यावेळी पं.स. उपसभापती अंजना सुतार,  पं.स. सदस्य जयदिप पोवार, माजी सदस्य रघुनाथ कुंभार, नंदकुमार पाटील,बिद्रीचे संचालक जगदिश पाटील,दिनकर कोतेकर, बाळासो तुरंबे,उंदरवाडीचे सरपंच संजय पाटील,बाळासाहेब फराकटे,बिद्रीच्या सरपंच आनंदी पाटील,पांडूतात्या पाटील,डी.डी. पाटील सर,अशोक पोवार, बी. एम.पाटील,इक्बाल नायकवडी, देवानंद पाटील,रमेश पाटील, नारायण पाटील,विलास पाटील, के.के.फराकटे, प्रकाश भिऊंगडे, एस.पी.पाटील.सचिन चौगले. यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments