परिवहन महामंडळाकडून " अधिस्विकृती धारक " पत्रकारांकरीता मोफत सवलतीचा आदेश
राधानगरी लाईव्ह विषेश
उपसंपादक अतुल पाटील
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून, अधिस्विकृती धारक पत्रकारांना विनामुल्य प्रवासाची सवलत दिल्या जात नसल्याच्या तक्रारी वाढलेल्या असल्यामुळे, महामंडळाची प्रतिमा जनमाणसात मालिन होत असल्याची जाण ठेऊन, अखेर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ,महाव्यवस्थापक (वाहतूक ) यांनी क्र. राप / वाह / सवलत / १३१९ दि .०१/०४/२०२१ नुसार जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे आपल्या सर्व विभागीय नियंत्रक व त्यांचे मार्फत सर्व बसस्थानक प्रमुख, चालक व वाहकांना, राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व, साधी, निमआराम आणि शिवशाही ( आसनी व शयनयान ) बसमधून, अधिस्विकृती धारक पत्रकारांना, विनामुल्य प्रवासाची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत . सदर्हु परिपत्रक वाशिम जिल्ह्याच्या, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेच्या जिल्हाध्यक्ष तथा साप्ता. करंजमहात्म्यचे संपादक, संजय कडोळे यांना मिळालेले असून, त्यांनी, महाव्यवस्थापक (वाहतूक ) यांनी, पत्रकारांच्या निष्काम सेवेची दखल घेऊन, आमचे बदल सहानुभूती दाखविल्याबदल, राज्य परिवहन महामंडळाचे , संजय कडोळे यांनी, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशीम आणि कारंजा पत्रकार मंचाचे वतीने आभार व्यक्त केले आहे .
0 Comments