कडगाव तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी व सध्या कल्याण येथे क्लास टू अधिकारी पदावर कार्यरत असलेले शहाजीराजे फाउंडेशन, कडगाव .या सामाजिक संस्थेचे संस्थापक सदस्य स्मृतीशेष भास्कर आनंत कांबळे यांचे आज को२ोणाशी लढताना निधन झाले. भास्कर कांबळे जिजाऊ - शिव -फुले - शाहू - आंबेडकर यांचे अनुयायी होते. शांत व मनमिळावू स्वभावामुळे सर्वांनाच हवेसे वाटणारेआदर्श व्यक्तिमत्व होते. समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी सतत कार्यरत होते. समाजासाठी काम करणार्या कोणत्याही संघटनेला त्यांचा मदतीचा हात होता त्यांच्या जाण्यामुळे सामाजिक परिवर्तन चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
0 Comments