Ticker

6/recent/ticker-posts

इब्राहिमपूर येथील रस्त्यालगतची विद्युतवाहिनी पेटी धोकादायक स्थितीत महावितरणचे दुर्लक्ष

इब्राहिमपूर येथील रस्त्यालगतची विद्युतवाहिनी पेटी धोकादायक स्थितीत महावितरणचे दुर्लक्ष 

नारायण शिरोळकर (चंदगड प्रतिनीधी)
चंदगड-आजरा मुख्य रस्त्यावरती इब्राहिमपूर गावच्या मुख्य रस्त्याला लागून महावितरणचा विद्युत वाहक पोल असून या पोलवर विद्युत वाहक पेटी बसविण्यात आली आहे ही पेटी जमीनीपासून केवळ दोन फुटावर बसविण्यात आली असुन गावचा मुख्य विद्युत भार उचलणार्‍या या पोलवरील सदर विद्युत वाहक पेटीला कसलाही दरवाजा नाही तसेच आतील विद्युत वाहक तारा या उघड्या आहेत त्यामुळे सदर विद्युत वाहक पेटी तात्काळ बदलण्यात यावी अशी मागणी इब्राहिमपूरचे सरपंच निळकंठ देसाई यांनी निवेदनाव्दारे चंदगड महावितरणचे मंडल आधिकारी यांना केली आहे मात्र महावितरण कडून अद्याप कसलाच प्रतिसाद नसून हा मुख्य रस्ता असल्याने धावण्याचा सराव करणारी मुल, शेतकरी तसेच जनावरांची मोठी रहदारी आहे अशा परस्थितीत जर भविष्यात याठिकाणी अपघात घडला तर याची जबाबदारी महावितरण घेणार का ? असा प्रश्न सरपंच निळकंठ देसाई यांनी महावितरण आधिकार्‍यांना विचारला आहे.
याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अभियंता गडहिंग्लज यांचेकडे देखील दाद मागीतली असून सदरची पेटी सुरक्षीत उंचीवर बसवून अत्यवस्थ विद्युततारका बदलून मिळाव्या अशी मागणी केली आहे यावर मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी लक्ष घालून सदर विद्युतवाहिनी पेटी त्वरीत बदलून मिळावी अशी मागणी इब्राहिमपूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments