कागल/प्रतिनिधी:
विजय कांबळे
                    
विकेंड लॉकडाऊनला कागल मध्ये100% प्रतिसाद मिळाला. शहरात सगळीकडे शुकशुकाट होता. सर्व वर्दळीची ठिकाने ओस पडली होती. सर्व व्यापारी व भाजीपाला व्यापाऱ्यांनी आपले नित्याचे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले होते. ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विकेंड लॉकडाउन ला आमचा विरोध नाही पण सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने सुरू करण्याला परवानगी द्यावी याबाबतचे निवेदन बुधवार दिनांक ०७ एप्रिल रोजी सर्व व्यापाऱ्यांनी कागल पालिकेचे मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.मात्र पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे कामकाज सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.आपण दिलेले निवेदन वरिष्ठ पातळीवर तात्काळ पाठवू अशी ग्वाही दिली.   
              आदेशाचे पालन करत कागल शहरातील सर्व भाजीपाला विक्रेते व व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून वीकेंड लॉक डाऊनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे.बस स्थानकचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारील वर्दळ व रहदारी शांत होती, तसेच कागल बस स्थानक कोल्हापूर वेस, खर्डेकर चौक, संभाजी चौक, गैबी चौक, निपाणी वेस, सांगाव नाका, ठाकरे चौक, शिवाजी चौक आदींसह सर्वत्र शुकशुकाट होता.  पोलीस व होमगार्ड यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.