प्राथमिक आरोग्य राशिवडे ब्रु व उपकेंद्र पुगांव अंतर्गत येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत लसीकरणास चांगलाच प्रतिसाद

राधानगरी लाईव्ह
उपसंपादक
अतुल पाटील

    प्राथमिक आरोग्य केंद्र राशिवडे ब्रु व उपकेंद्र पुगांव अंतर्गत राशिवडे खुर्द येथील केंद्रीय प्राथमिक शालेत लसीकरणास चांगलाच प्रतिसाद मिळत होता.राशिवडे खुर्द पुंगाव या गावातील लोकांनी कोरोना प्रतिबंध लसीचा लाभ घेतला
येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ करणेत आला प्रा वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांबळे  व समुदाय सहायक डॉ संग्राम पाटील. आरोग्य सेवक विक्रांत फडतरे आरोग्य सहाय्यक के के पाटील आरोग्यसेविका जयश्री मोहिते कर्मचारी उपस्थित होते .
तसेच आज राधानगरी राशिवडे बुद्रुक या ठिकाणी येऊन मोहडे वाघवडे कोदवडे येळवडे या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा लाभ घेतला आहे.तसेच उद्या आवळी ब्रू या ठिकाणी लस देण्यात येणार आहे तरी आसपासच्या गावाने लसीकरण याचा लाभ घ्यावा असे आरोग्य सेवक डॉ विक्रांत फडतरे यांनी सांगितले
४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याने कित्येक दिवसांपासून त्यांच्यासाठी लसीची प्रतीक्षा होती. मात्र, आता त्यांना लस दिली जाणार असल्याने प्रतीक्षा संपली आहे.
येथे ज्येष्ठ नागरिक वय वर्ष  ६० वरील व ४५ ते ५९ वयोगटातील कोमॉरबीड (बी.पी, शुगर, कॅन्सर, आजारी) प्रतिबंधात्मक लसीकरण चालू आहे.६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व  कोमॉरबीड नागरिकांनी मोफत कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रा.आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांबळे यांनी जनतेला आव्हान केले आहे.
यावेळी  आरोग्य सेवक विक्रांत फडतरे रंगराव वायदंडे जावेद सनदी   पोलीस पाटील चंद्रकांत कांबळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी तसेच ग्रामसेवक डी एन पाटील सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायतीचे कर्मचारी डॉ भगवान पाटील तसेच कै  शेवंताबाई कृष्णराव किरुळकर विद्या मंदिर राशिवडे खुर्द शाळेची कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य अंगणवाडी सेविका आशा वर्कर व गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व दूध संस्थेचे सेक्रेटरी कर्मचारी शिक्षक वर्ग उपस्थित होते