Ticker

6/recent/ticker-posts

इब्राहिमपूर येथील शेतकरी बेपत्ता चंदगड पोलीसात फिर्याद दाखल

इब्राहिमपूर येथील शेतकरी बेपत्ता चंदगड पोलीसात फिर्याद दाखल

नारायण शिरोळकर
(चंदगड प्रतिनीधी) :

इब्राहिमपूर येथील शेतकरी गुनाजी गोविंद हरेर (वय ५०, रा. इब्राहिमपुर, ता. चंदगड जि. कोल्हापुर) हे शुक्रवार दि.०२ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ पासून इब्राहिमपूर गावचे हृददीत असले बोकड नावचे शेतातील पत्रा शेड येथुन बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांचे वडील गोविंद धोंडीबा हरेर (वय ७०, रा. इब्राहीमपुर ता. चंदगड जि. कोल्हापुर) यांनी चंदगड पोलीस ठाण्यात हरवल्याची फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणातील बेपत्ता गुनाजी गोविंद हरेर यांचे वर्णन पुढील प्रमाणे असून उंची ५ फुट ६ इंच, नाक -सरळ, केस-काळे-पांढरे, अंगावर लाल पट्याचा शर्ट व तपकिरी रंगाची हाफ पॅन्ट, डोक्याला टॉवेल आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,यातील वर्दीदार यांचा मुलगा गुनाजी गोविंद हरेर (वय ५०वर्षे, रा. इब्राहिमपूर ता. चंदगड) हा त्यांचे इब्राहमपूर गावचे हददीत असलेले  बोकड नावचे शेतात राहणेस असुन तो अधुन मधुन घराकडे येत होता. मात्र, शुक्रवार दि.०२ एप्रिल २०२१ रोजी साधारण सकाळी ९ वा पुर्वी कोणास काही न सांगता शेतातुन कोठेतरी निघुन गेला आहे. तो अद्याप घरी परत न आल्याने व त्याचा नातेवाईक, पै पाहूणे, मित्र परीवार यांचेकडे चौकशी करुन शोधा शोध करुन देखील तो मिळुन आला नाही. त्यानंतर त्याचे वडील यांनी तो हरवल्याची तक्रार चंदगड पोलीसात दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास मा.पो.नि.सो यांचे मुखशिल आदेशाने पो ना. महापुरे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments