जि.प.सदस्य जिवन पाटील यानां राष्ट्रीय भारत ज्योती गौरव पुरस्कार जाहीर
बाळासाहेब बोडके
(भुदरगड प्रतिनिधी)
कुर (ता-भुदरगड) येथील आकुर्डे मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांना त्यांनी केलेल्या विविध सामाजिक उपक्रम व विक्रमी विकासकामांसाठी पोहच पावती म्हणून इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी न्यु दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय भारत ज्योती गौरव अवार्ड ने गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपती, विविध राज्यांचे राज्यपाल व इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत. हा गौरव सोहळा ९एप्रिल २०२१ रोजी दिल्ली येथे लुढिया गार्डन मध्ये होणार आहे.
0 Comments