Ticker

6/recent/ticker-posts

*स्वतंत्र सांगली आष्टा संख उमदी किंवा माडग्याळ तालुका करावे बाबत शिवसेनेच्या वतीने जन आंदोलन उभारणार....!प्रतिनिधी,प्रमोद चिनके.सांगली जिल्हा

प्रतिनिधी,
प्रमोद चिनके.
सांगली जिल्हा,
सांगली.
   *स्वतंत्र सांगली आष्टा संख उमदी किंवा माडग्याळ तालुका करावे बाबत शिवसेनेच्या वतीने जन आंदोलन उभारणार....!

    स्वतंत्र सांगली, आष्टा, संख, व  उमदी किंवा माडग्याळ तालुका होण्यासाठी जन आंदोलन उभारणार.....        जितेंद्र शहा शिवसेना सांगली
गेल्या 4 ते 5 वर्षापासून सदरच्या सांगली, आष्टा, संख व उमदी किंवा माडग्याळ स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा बाबत शिवसेनेच्यावतीने वारंवार 2 ते 3 वेळा आंदोलन व बऱ्याच वेळा शासनदरबारी पाठपुरावा करण्यासाठी
निवेदन देऊन सातत्याने मागणी लावून धरल्याने तात्कालीन सरकारच्या काळात सांगली, आष्टा, संख येथे फक्त अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर झाले पण तात्कालीन सरकारने व महसूल मंत्री यांनी स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी प्रलंबितच ठेवले त्या अनुषंगाने इथून पुढच्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा करून या जनतेच्या मागणीचा विचार करून वरील सर्व ठिकाणी स्वतंत्र तालुका होण्यासाठी गरज पडल्यास जनआंदोलन उभा करणार आहोत वरील ठिकाणच्या शहरांना स्वतंत्र तालुक्याचा दर्जा दिल्यास त्या तालुक्याला खूप मोठ्या प्रमाणात सरकार कडून विकास निधी येण्यास मदत होणार आहे व त्या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे त्या अनुषंगाने जनतेची मागणी आहे त्यामुळे शिवसेना सदरच्या जनतेच्या मागणीचा विचार करून स्वतंत्र तालुक्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

Post a Comment

0 Comments