पोलीस पाटीलांवरील हल्ले हे पोलीस कर्मचार्यांवरील हल्ह्याइतकेच गंभीर - चंदगड पोलीस निरीक्षक बी.ए.तळेकर
नारायण शिरोळकर (चंदगड प्रतिनिधी) :
कोरोना काळात गावात लग्नामध्ये लावलेले गाण्याचे बॉक्स व बेंजो बंद केल्याच्या कारणावरून पोलीस पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची घटना नुकतीच चंदगड तालुक्यातील कळसगादे या ठिकाणी घडली होती या मारहाण प्रकरणी आता चंदगड पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदगड पोलीसांकडून मिळालेल्या माहिती नुसार या प्रकरणातील मनोहर भवाना दळवी, आनंद दत्तु दळवी व रामा भिकाजी दळवी (सर्व रा.कळसगादे ता. चंदगड) अशी आरोपींची नावे आहेत. सदानंद विठु सुतार (वय ३७, गावकामगार पोलीस पाटील रा.कळसगादे, ता.चंदगड, जि. कोल्हापुर) यांनीयासंदर्भात चंदगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
सदर घटना सोमवार ( दि.२६ एप्रिल २०२१ रोजी ) रात्री साडेनऊ ते रात्री दोन च्या दरम्यान विठोबा मोतीराम गावडे यांचे राहते घराचे दारात व फिर्यादीचे यांचे राहते घरात कळसगादे (ता चंदगड) या ठिकाणी घडली असून यामध्ये फिर्यादी व फिर्यादीची काकु जखमी झाले आहेत.
या संदर्भात चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.ए.तळेकर यांनी या प्रकरणी कडक भूमिका घेतली असून .पोलीस पाटील किंव्हा अन्य कर्मचाऱ्यांवर हल्ला होणे म्हणजे अप्रत्यक्षरित्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला होणे असे आम्ही गृहीत धरतो त्यामुळे आम्ही सत्वर आरोपींना पकडण्यासाठी टीम तयार केली आहे.तरी आरोपींची गय केली जाणार नाही अशी भुमीका त्यांनी माध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
0 Comments