कोरोना वाढती रुग्ण संख्या आणि त्या पार्श्व भूमीवर करण्यात आलेला लॉक डाऊन त्याचा परिणाम म्हणजे कोणताही सर्व सामान्य , गरीब शेतकरी , हतावरिल पोट असणारे कामगार यांना घरात बसून असेल ती भाजी भाकरी खाऊन दिवस काढावे लागत आहे . यातच भरीत भर म्हणून कि काय या संकट काळात मायक्रो फायनास वाले अशा वेळी येऊन हप्ता जोर जबर दस्तिन वसुल करत आहेत .
मग या फायनास वाल्याना काही नेम आहे कि नाही सरकार यांना काही सूचना करते कि नाही . यांना कोरोना संधर्भात काही नेम आहेत कि नाही .जर सामान्य माणुस रस्त्यावर दिसला तर त्याची जाग्यावर टेस्ट करणार आणि यांना जनतेला लूटाय असेच वाऱ्यावर सोडणार का ? असाच एक प्रसंग
चुये ता. करवीर येथे घडला आहे. fincare या मायक्रो फायन्सास कंपनीचे वसूली अधिकारी महिलांना हप्त्यासाठी दमदाठी करत होते . ही बातमी ब्लॅक पॅंथर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना समजताच पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा विजय माने, जिल्हा सचिव मा दिगंबर कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी मा विकास कांबळे,करवीर ता . उपाध्यक्ष सौ . सपना कांबळे मॅडम आदिनी घटनास्थळी भेट दिली वसूली आधिकारी यांची चांगलीच कानउघडणी केली व माफी मागण्यास भाग पाडले तसेच इथून पूढे सक्तीने वसूल करणार नाही याची हमी दिल्यानंतर त्यांना समज देवून सोडण्यात आले.
0 Comments