Ticker

6/recent/ticker-posts

साता जन्माच्या गाठी; पतीच्या निधना दिवशीच पत्नीचेही निधन

साता जन्माच्या गाठी; पतीच्या निधना दिवशीच पत्नीचेही निधन

विजय कांबळे
(बेलवळे बु प्रतिनिधी)


राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी गावातील अतिशय गोड मनाची जोडी,नोकरीनिमित्त परगावी स्थायिक असलेले पण गावाशी नाळ जोडलेले,कस्टम सेंट्रल एक्साईज खात्यामध्ये हेड कॉन्स्टेबल पदापर्यंत कर्तव्य बजावलेले,तसेच २००३ साली त्यांना पुणे पोलीस डिव्हिजन येथे प्रामाणिकपणे नोकरी केल्याबद्दल त्यांच्या कर्तव्यास सलाम म्हणून, राहुल बजाज यांच्याकडून सन्मान चिन्ह पदक मिळालेले,दत्ताञय गणपती खोत(वय ६८) यांच्या निधना पाठोपाठ त्यांच्या पत्नी इंदुमती दत्ताञय खोत (वय ६१ ) यांनीही प्राण सोडला,एकाच दिवशी मृत्यू आल्यामुळे, साता जन्माच्या गाठी मरणासोबत सोडल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
               या जोडप्याच्या अचानकपणे जाण्याने संपूर्ण चांदेकरवाडी गाव हळहळला,हे जोडपे दरवर्षी आपल्या गावात पोथी समाप्ती जागराला न चुकता  आंबाबईचे दर्शन घेण्यासाठी यायचे,ग्रंथाचा शेवटचा अध्याय मन लावून ऐकायचे सर्वांना गळाभेट द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद घेऊन निघून जायचे,आपल्या अंबिका देवालय बद्दल त्यांना खूप श्रद्धा होती, सर्वांना आपलंसं करणारी गोड वाणी,सर्वांची अगदी जिव्हाळ्याने चौकशी करायचे,कामानिमित्त जरी यांनी गाव सोडले असले तरी गावची नाळ तुटू दिली नाही,असे हे दत्तात्रय गणपती खोत(आण्णा) आणि त्यांच्या यांच्या नावासमोर कै.लावताना मन अगदी भरून येते,त्यांच्या पश्चातज्ञ आई दोन मुलगे,एक मुलगी,जावई व नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments