Ticker

6/recent/ticker-posts

नाईकवाडी ता. भुदरगड येथील लोकवस्तीतील विदयूत खांब धोकादायक .बाळासाहेब बोडके ,भुदरगड प्रतिनिधी

नाईकवाडी (ता.भुदरगड) येथील अनेक ठिकाणी लोकवस्तीत  जीर्ण अवस्थेत असलेले ८ ते ९ वर्षापूर्वी विधुतखांब व विदुयत मंडळाने डी पी  बसवली होती, पण ती कित्येक दिवसा पासुन ती बंद आवस्येत आहे, पण याकडे विदुयत मंडळाने पाठ फिरवली आहे विदुयत पुरवठा खंडित आहे तो सुरू करावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाईक यानी, विदुयत मंडळाला निवेदन दिलेले होते पण त्यांची कोणी दखल घेतली नाही.
 गावामध्ये जीर्णअवस्थेत असलेले विधुतखांब पडून एखाद्यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी या होणाऱ्या दुर्घटनेला महावितरण कंपनी जबाबदार असेल, नाईकवाडी गावातील डी पी प्रत्यक्ष पाहणी करून   सुरक्षित विधुतपुरवठा करावा ,जेणेकरून कोणत्याही धोका होणार नाही , असे गावातील लोकांनी सांगितले ,यावेळी उपस्थित   माकल डिसोझा, महादेव मरगज, प्रकाश सावंत,सूर्यकांत नाईक, सचिन पटकले, विठ्ठल शिंदे, सुशांत नाईक, सुरेश निवळे, युवराज पोवार,  प्रथम नाईक आदी लोक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments