Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

राष्ट्रवादी काँग्रेस  जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.


राधानगरी प्रतिनिधी/ रोहन कांबळे

                        कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोळांकूर येथे व्यंकनाथ  देवालय येथे भव्य रक्तदान शिबिर, छत्रपती प्रमिलाराजे वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर  यांच्या सहयोगातून संपन्न झाले.

                      कोरोनाच्या या महाभयंकर महामारीत  रक्ताची कमतरता भासत आहे. याचा विचार करून ए.वाय.पाटील फाऊंडेशन,राधानगरी तालुका राष्ट्रवादी पक्ष व सर्व सेल यांच्या वतीने मा.ए.वाय.पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये तब्बल 366 जणांनी आपले रक्तदान करून या सारख्या महाभयंकर रोगांमध्ये आपले मोलाचे योगदान दिलेले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
       यावेळी  माजी आमदार के.पी.पाटील, गोकुळ चे संचालक अरुण डोंगळे,अरुण नरके,अभिजीत तायशेट्टी,नेताजी बी पाटील,एकनाथ पाटील,उमेश भोईटे,जगदीश पाटील,मुकुंद देसाई (आजरा) जि.प.सदस्य विनय पाटील,सर्जेराव पाटील (गवशीकर) इ. मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments