Ticker

6/recent/ticker-posts

गोकुळसाठी संग्रामसिंह कुपेकर गटाचा सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला जाहीर पाठींबा

गोकुळसाठी संग्रामसिंह कुपेकर गटाचा सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला जाहीर पाठींबा 

नारायण शिरोळकर (चंदगड प्रतिनिधी)
आज कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) 
येथे संग्रामसिंह कुपेकर यांच्या निवासस्थानी चंदगड विधानसभा मतदार संघातील संग्रामसिंह कुपेकर गटाच्या गोकुळ दूध ठराव धारक व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात सर्व कार्यकर्ते व ठराव धारक यांच्या संमतीने संग्रामसिंह कुपेकर यांनी आपल्या गटाचा सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठींबा जाहीर केला.
या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी सत्तारूढ गटाचे नेते महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री भरमु आण्णा पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, रणजित पाटील मुरगुडकर, सम्राट महाडिक, भैय्यासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, प्रकाश चव्हाण, सदानंद हत्तरगी, भरमाना गावडा, बी एम पाटील, भाई वाईंगडे, दिगंबर देसाई, वसंतराव नंदनवाडे, राजन महाडिक, सदानंद पाटील, उदयकुमार देसाई, बबनराव देसाई, अरुण पाटील, तानाजी पाटील, प्रकाश दळवी, आनंदराव देसाई, बंडोपंत रावराणे, आनंदराव मटकर, राजू रेडकर, प्रमोद कांबळे, डॉ अनिल पाटील, अशोक खोत, दत्तू विजणेकर, एन डी कांबळे, प्रशांत नाईक, यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments