उंदरवाडी, ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद उपक्रम
बाळासाहेब बोडके:
. ग्राम पंचायत मौजे उंदरवाडी, ता. कागल या ग्रामपंचायतीने थकित पाणीपट्टी, घरफाळा इं .करांच्या वसुलीसाठी Xलकी ड्रॉ X लॉटरी पध्दत अवलंबली त्यास ग्रामस्थानी पण चांगला प्रतिसाद दिला.
ग्रामपंचायतीच्या एकूण २१ लाख थकित रकमेपैकी १९ लाख वसूल केले. या लकी ड्रॉ मध्ये एकूण २१ बक्षीसे ठेवली होती. अगदी फ्रिज पासून खुर्चीपर्यंत बक्षीसे होती बक्षीस वितरणावेळी सरपंच भारती संजय पाटील, उपसरपंच संजीवनी दत्तात्रय पाटील, मारूती पाटील , गीतांजली विष्णू बोडके , सरीता सर्जेराव पाटील , अमोल गुरव, ग्राम कमिटीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments